"घेई छंद' पुस्तकाबरोबरच डीव्हीडीचेही अनावरण


पुणे, दि. 13 (प्रतिनिधी) - "संगीत नाटक कट्यार काळजात घुसली', "बालगंधर्व', "लोकमान्य' आणि "कट्यार काळजात घुसली' चित्रपट या चारही गोष्टीतील समान धागा म्हणजे अभिनेता ते दिग्दर्शक असा प्रवास करणार आपला लाडका अभिनेता सुबोध भावे. कट्यार नाटक ते कट्यारचे माध्यमांतर असा प्रवास शब्दबद्ध करत सुबोधने "ऐतीहासीक खजिना' रसिकांसाठी "घेई छंद'च्या माध्यमातुन आणला आहे. या पुस्तकाचा ह्रदयस्पर्शी वाचकार्पण सोहळा आठवणींच्या कोलाजात आज दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. 
बालगंधर्व रंगमंदिर येथे रसिक साहित्य आंतरभारती आणि ग्राफ 5 आयोजीत या सोहळ्याला अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ संगीतकार
गायक शंकर महादेवन, राष्ट्रपती पुरस्कार विजेता युवा गायक महेश काळे, दिग्दर्शक रवी जाधव, कवी - अभिनेता संदिप खरे, गायीका बेला शेंडे, सचिन गवळी, निर्माते सुनिल फडतरे, चिन्मय पाटसकर, प्रसद सुतार, स्वप्नील वारके, साहिल कोपर्डे, लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक योगेश नांदुरकर, मनोज अडसूळ, अभय इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. "घेई छंद' पुस्तकाबरोबरच डीव्हीडीचेही अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. 
कट्यार सिनेमाच्या प्रदर्शित होण्याच्या पहिल्या वाढदिवशीच कट्यार ते कट्यार असा प्रवास उलगडताना सुबोध म्हणाला, माणुस आणि कलाकार म्हणुन घडताना आई - वडिलांचे संस्कार पाठिशी होते. पं. शौनक अभिषेकींमुळे गाण्यांची ओळख झाली तर राहुल देशपांडेमुळे संगीत नाटक समजले. "मैतर'चे प्रयोग सुरू असताना राहुलने मला कट्यारचे दिग्दर्शक कर असे सांगीतले ते माझ्यासाठी मोठे अव्हान होते. ते अव्हान पेलताना मनावर मोठे दडपण होते मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे ते मी पेलले, यातुनच पुढे "बालगंधर्व' चित्रपट करावा असे वाटले. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे मी स्वःतच माझी स्क्रिन टेस्ट घेतली आणि पास झालो पुढे नितीन देसाई आणि रवी जाधवने माझ्यावर विश्‍वास दाखवल्याने माझा आत्मविश्‍वस सार्थ ठरला. "बालगंधर्व' साकारल्यानंतर "लोकमान्य' माझ्याकडून बालगंधर्वांनीच करवुन घेतला असे नमुद करताना सुबोधने सांगीतले की, बालगंधर्वांना वाटले असेल मला ज्याने ओळख दिली आहे ते अद्याप मोठ्या पडद्यावर आलेले नाहीत हे काम तुच करावे अशी त्यांची इच्छा असावी, योगायोगाने मी या सिनेमाचा विचार करत असताना ओम राऊतने मला मुख्य भुमीकेसाठी विचारले मी होकार दिला मात्र शुटींग सूरू होई पर्यंत मला लोकमान्यांच्या नजरेतील देशाप्रतिचा रोमॅंटिझम सापडत नव्हता याचे दुःख होते अखेर तो मला सापडला आणि बाकी तुम्ही पडद्यावर पाहिलेच आहे. कट्यार सिनेमा करण्याचे मोठे अव्हान होते दारव्हेकरांच्या संहितेला, अभिषेकीबुवांच्या संगीताला छेडने सोपे नव्हते मात्र सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ते अव्हान आम्ही यश्‍स्वीरित्या पुर्ण केल्याचे त्याने सांगीतले. 
कट्यार नाटकात सदाशीव ते सिनेमात सदाशिवचा आवाज आणि राष्ट्रीय पुरस्कार असा प्रवस सांगताना महेश काळे म्हणाले, नाटकात सदशिव साकारताना सुबोधने माझ्यावर खुप मेहनत घेतली. चित्रपटाचे यश हे सुबोध आणि शंकर महादेवन यांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. 
सुबोध आपल्या कामाप्रति प्रचंड पॅशिनेटेड असल्याचे संदिप खरे यांनी नमुद केले तसेच माझ्या प्रेम कवितांची प्रेरणा सुबोधने बांलगंधर्व मध्ये साकारलेल्या स्त्री भुमीकेत दिसला तशी असते आणि सुबोध स्टेज आणि सेटच्या बाहेर नट नसतो यामुळेच तो चांगला असल्याचेही सांगीतले. 
बालगंधर्व पासून सुबोधशी मैत्री होती असे सांगताना शंकर महादेवन म्हणाले, सुबोधच्या कामाविषयी माहिती होती त्याअने कट्यारचे नाव काढले तेंव्हा मी त्याला नकार दिला मात्र नंतर विचार केला की आजच्या जमान्यात असा निखळ संगीत देण्याचा मोका पुन्हा मिळणर नाही. पंडितजीची भुमीका मी करावी असा विचार त्याने मांडल्यावरही मी तोच विचार केल्याचे त्यांनी सांगीतले. आठवणी, किस्से आणि शंकरजी व महेशच्या अवाजातील "सुर निरागस हो....', घेइ छंद मकरंद....' या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :