श्रावणबाळ रॉकस्टार ची दिवाळी मस्ती Rabu, 26 Oktober 2016 Celebrity, Fashion, Food, Gossip, India, Lifestyle, News, Style, Travel, World झी युवा या वाहिनीवरील श्रावणबाळ रॉक स्टार या मालिकेच्या सेटवर नुकतीच दिवाळी साजरी करण्यात आली .यावेळी सर्वच कलाकारांनी भरपूर मस्ती केली . यात बऱ्याच कलाकारांचे नवे नवे कलागुण दिसून आले . केतकीम्हणजेच कामिनी हि सुंदर अभिनेत्री , उत्तम कलाकार आहे हे आपल्या सर्वानाच माहित आहे . ती उत्तम नाचते हेहि जगजाहीर आहे , पण ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे . सेटवर सर्वांबरोबर मस्ती करताना तिने सुंदर गाणंहीगायले . त्याच प्रमाणे संचिता म्हणजेच नितु हि अतिशय उत्तम मिमिक्री करते . तिने डोरेमॉन नामक कार्टून मधीलनोबेतो या केरेक्टर चा हुबेहूब आवाज काढत सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या . या दिवाळी सेलेब्रेशन मध्येमालिकेतील नीरज गोस्वामी , केतकी पालव , संचित कुलकर्णी , राजेश देशपांडे , सुप्रिया विनोद , आशिषकापिसकर पार्थ घाटगे आणि जयवंत वाडकर हे सर्वच कलाकार उपस्थित होते . झी युवा च्या या सर्वचकलाकारांनी सर्वाना इको फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेट करण्याचं आवाहन केले आहे . श्रावणबाळ रॉकस्टार हि मालिकाझी युवा ह्या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज ७:३० वाजता लागते . Tweet Subscribe to receive free email updates: