सहा दशकाहून अधिककाळ विविध भाषांमध्ये आपल्या सुमधुर स्वरांनी भारतीय संगीतावर आशा भोसले यांनी अधिराज्य केले. झी क्लासिकने अशा या दिग्गज गायिकेचा ८३वा वाढदिवस संगीतमय कार्यक्रमासह नुकताच मुंबई मधील भाईदास सभागृहात साजरा केला. महेश टिळेकर निर्मित झी क्लासिकच्या ‘टाईमलेस आशा’ या कार्यक्रमामध्ये खुद्द आशा भोसलेजी उपस्थित होत्या. यावेळी मानाचा मुजरा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या संध्येमध्ये ऊर्मिला मातोंडकर, राधिका आपटे, टेरेन्स लुईस, भूमी पेडणेकर, लॉरेन गॉटलिब, माही गिल यांनी अव्वल नृत्य दिग्दर्शक राघव, मुक्ती आणि शक्ती मोहन सोबत परफॉर्म केले. झी टॅाकीजच्या प्रेक्षकांना ३० ऑक्टोबरला सायं. ७.०० वा. हा कार्यक्रम पाहता येईल.
पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, डिंम्पल कपाडिया,झीनत अमान, हेलन, तब्बू, बिंदू, जयाप्रदा, लीना चंदावरकर, शान, उदित नारायण अशी हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी तसेच माननीय शरद पवार सपत्निक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आशाजी म्हणाल्या की, माझ्या गाण्यांवर आजच्या तरुण गायकांना परफॉर्म करताना पाहणे हा खरंच सुखद अनुभव आहे. आजवर ज्या ज्या अभिनेत्रींना मी आवाज दिला त्यांना एवढया वर्षानंतर एकत्र मंचावर पाहणे हे माझ्यासाठी निश्चितच आनंददायी आहे.
‘टाईमलेस आशा’ या अनोख्या कार्यक्रमाचा आस्वाद रविवार ३० ऑक्टोबरला सांयकाळी ७.०० वा झी टॅाकीजवर अवश्य घ्या.