झी टॅाकीजवर ‘मुंबई-पुणे-मुंबई २’

आजच्या तरूणाईची लग्नाविषयी स्वतःची अशी काही ठाम मत आहेत. नेहमीच नवं काहीतरी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करणारा मराठीतील आघाडीचा सिनेदिग्दर्शक सतीश राजवाडे यांनीमुंबई-पुणे-मुंबई   या सिनेमातून तरूणाईचा दृष्टीकोन रंजकपणे मांडला. या धमाल चित्रपटाचा  वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर रविवार १६ ऑक्टोबर दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा झी टॅाकीजवर होणार आहे.
मुंबई-पुणे-मुंबई   लग्नाला यायचं या चित्रपटाची कथा गौतम प्रधान (स्वप्नील जोशी) आणि गौरी देशपांडे (मुक्ता बर्वे) यांच्या लग्नाची म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या लग्नाची. पण या दोघांच्या लग्नाचे दिवस जवळ येत असताना कथानकात अचानक एक ट्विस्ट येतो. हा ट्विस्ट काय आहे? याची रंजक काहणी म्हणजे मुंबई-पुणे-मुंबई   हासिनेमा. स्वप्नील जोशीमुक्ता बर्वेप्रशांत दामलेमंगल केंकरेविजय केंकरेसविता प्रभुणेआसावरी जोशीश्रॄती मराठे आणि सुहास जोशी या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. मुंबई-पुणे-मुंबई २ या सिनेमाचा आस्वाद येत्या रविवारी १६  ऑक्टोबर दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर अवश्य घ्या.

Subscribe to receive free email updates: