महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? 2016 नामांकनांची घोषणा मतदान कौल प्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरु


चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिक प्रेक्षकांचेज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते  असा पुरस्कार सोहळा म्हणजे .. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक व भव्य स्वरूप प्राप्त झालंय. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्याचित्रपटांची निर्मिती होत आहे. याची दखल घेत यंदाही या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम सिनेमांची निवड करण्यात आली आहे. आता प्रेक्षकांनासुद्धा या सिनेमांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमाची निवड करायची आहे.या पुरस्कारासाठी मतदान करून प्रेक्षकांनी आपल्या आवडीच्या चित्रपटाला व कलाकाराला निवडून दयायचं आहे. झी टॅाकीजच्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे लकी विजेत्यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांना आपलंस करणाऱ्या कलावंतांना दिला गेलेला मानाचा मुजरा म्हणजे झी टॅाकीज आयोजित 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हा सन्मानसोहळा. रसिकांच्या मतांवर अवलंबून असलेल्यामहाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?२०१६ या सोहळ्याचे पडघम मनोरंजनसृष्टीतवाजू लागले असून नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यातआली आहेत. गेल्या सात वर्षांपासून आयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष आहे. रसिक प्रेक्षकांचा सर्वाधिक कौल मिळणाऱ्या नामांकनांमधून अंतिम विजेता घोषित होणार आहे.
झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१६ पुरस्कारासाठीच्या मतदान प्रक्रियेला १५ ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे. यापुरस्काराच्या मतदानासाठी झी टॉकीज वाहिनीने दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये नामांकन असलेल्यांना ‘मिस्ड् कॅाल’ देऊन प्रेक्षक आपली मतं नोंदवू शकतात. ही मतदान प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दुसरा पर्याय डिजिटल मतदानाचा असून यासाठी झी टॅाकीजच्या www.zeetalkies.com/mfk  या वेबसाईटवरसुद्धा प्रेक्षकांना आपली मत नोंदवता येतील. ही मतदान प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहेमहाराष्ट्राची जनता आता कोणाला कौल देणार? या निवडणुकीत कोणाचा आवाज घुमणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत घोषित करण्यात आलेल्या नामांकनामध्ये ‘सैराट’ व ‘कट्यार काळजात घुसली’ला सर्वाधिक नामांकने मिळालीत. ‘नटसम्राट’, ‘वाय झेड’, उर्फी, ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘दगडी चाळ’, ‘मुंबई पुणे मुबंई २’,‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटांतून कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या सर्वाधिक मतांचा कौल जिंकेल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. नामांकन मिळविलेल्या गौरवार्थींची नावे खालील प्रमाणे आहेत.
नामांकने
सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘सैराट’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘दगडी चाळ’, ‘पोश्टर गर्ल’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुबोध भावे (‘कट्यार काळजात घुसली’),महेश मांजरेकर(‘नटसम्राट’), नागराज मंजुळे(‘सैराट’), चंद्रकांत कणसे(‘दगडी चाळ’), सतीश राजवाडे (‘मुंबई पुणे मुंबई २’), समीर पाटील(‘पोश्टर गर्ल’)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुबोध भावे (‘कट्यार काळजात घुसली’), नाना पाटेकर (‘नटसम्राट’), आकाश ठोसर(‘सैराट’), अकुंश चौधरी (‘दगडी चाळ’), स्वप्नील जोशी(‘मुंबई पुणे मुंबई २’)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता खानविलकर(‘कट्यार काळजात घुसली’), मृण्मयी देशपांडे(‘कट्यार काळजात घुसली’),रिंकू राजगुरू(‘सैराट’), मुक्ता बर्वे (‘मुंबई पुणे मुंबई २’), मेधा मांजरेकर(‘नटसम्राट’),सोनाली कुलकर्णी (‘पोश्टर गर्ल’)
पॉप्युलर फेस ऑफ द इयर- रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, सई ताम्हणकर, स्पृहा जोशी,
सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन - आकाश ठोसर, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, सिद्धार्थ चांदेकर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -  प्रशांत दामले (‘मुंबई पुणे मुंबई २’), विक्रम गोखले (‘नटसम्राट’), जितेंद्र जोशी(‘पोश्टर गर्ल’), मकरंद देशपांडे (‘दगडी चाळ’), तानाजी गालगुंडे(‘सैराट’),
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे(‘नटसम्राट’), नेहा पेंडसे(‘नटसम्राट’), आसावरी जोशी (‘मुंबई पुणे मुंबई २’), साक्षी तन्वर (‘कट्यार काळजात घुसली’), छाया कदम(‘सैराट’)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता – अमितरियान पाटील (‘राजवाडे अॅण्ड सन्स’), आकाश ठोसर (‘सैराट’),अक्षय टांकसाळे (‘वाय झेड’)
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री – ‘रिंकू राजगुरू’ (‘सैराट’), मिताली मयेकर (उर्फी), कृतिका देव (‘राजवाडे अॅण्ड सन्स’)
सर्वोत्कृष्ट खलनायक – सूरज पवार (‘सैराट’), सचिन पिळगांवकर (‘कट्यार काळजात घुसली’), संजय खापरे (‘दगडी चाळ’), सुरेश विश्वकर्मा (‘सैराट’)
सर्वोत्कृष्ट गायक - अजय गोगावले ‘याड लागलं’ (‘सैराट’), अजय गोगावले ‘सैराट झालं जी’ (‘सैराट’), अजय गोगावले ‘झिंग झिंग झिंगाट’(‘सैराट’), शंकर महादेवन ‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), आनंद शिंदे, आदर्श शिंदे ‘आवाज वाढव डीजे’ (‘पोश्टर गर्ल’), महेश काळे ‘अरुणी किरणी’(‘कट्यार काळजात घुसली’)
सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल ‘आता बया का बावरलं’(‘सैराट’), चिन्मयी श्रीपाद ‘सैराट झालं जी’ (‘सैराट’), आनंदी जोशी ‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), बेला शेंडे ‘साथ दे तू मला’(‘मुंबई पुणे मुंबई २’), आनंदी जोशी, बेला शेंडे ‘बॅण्ड बाजा वरात’ (‘मुंबई पुणे मुंबई २’), आनंदी जोशी ‘धागा धागा’ (‘दगडी चाळ’),
सर्वोत्कृष्ट गीत - ‘याड लागलं’ (‘सैराट’), सैराट झालं जी (‘सैराट’), ‘झिंग झिंग झिंगाट’(‘सैराट’), ‘आता बया का बावरलं’(‘सैराट’),‘सूर निरागस हो’ (‘कट्यार काळजात घुसली’), ‘आवाज वाढव डीजे’ (‘पोश्टर गर्ल’)

Subscribe to receive free email updates:

Related Posts :